Tuesday, October 6, 2015

गुलाब जामून का म्हणतात ?

गुलाब जमून म्हणजे इंग्रजीमध्ये रोस बेरी म्हणजे गुलाबाच्या चवीत आणि सुगंधात घोळलेले जामून म्हणजे जांभूळ. यात असलेले जामून हे जांभळासारखे दिसतात, व पाकात गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकतात, त्याने गुलाबाचा सुवास यात येतो. हा पदार्थ अरबी देशांमध्ये सुद्धा खाल्ला जातो, तेथे त्याचे नाव आहे लुक्मत अल कादी, हा पदार्थ पेर्शिअन संस्कृतीतीन भारतात आला आहे असे इतिहास सांगतो.

साहित्य -

जामूनसाठी
२ वाट्या खवा 
१/२ वाटी  मैदा 
साजूक तूप ३-४ चमचे 
दुध १ कप 

पाकासाठी- 

१/२ लिटर पाणी
५-६ केशर पाकळी 
३-४ वाट्या साखर 
३-४ वेलची पूड केलेले 

कृती 
१. जामून बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा खवा आणि तूप घेऊन त्यात थोडे थोडे दुध टाकून मळून घ्यावे व त्याचे एक इंच रुंदीचे गोळे करून घ्यावे व ते बाजूला ठेवावे. 
२. एका भांड्यात पाकचे साहित्य एकत्र करून पाक उकळायला ठेवावे  पाक उकळला आणि एक तारी झाला कि तो बाजूला काढून ठेवावा. 
३. काढइत तेल/तूप  गरम करायला ठेवावे व तयार जामून त्यात तळून घ्यावे व थोडे गरम असतानाच पाकात टाकावे. 

No comments: