Thursday, October 8, 2015

माईक्रोवेव खिचडी


साहित्य

२ वाटी तांदूळ
१ वाटी डाळ
१ गाजर चिरलेले
१ टोमाटो चिरलेला
१ सिमला मिरची चिरलेली
फोडणी साठी- तेल, मोहरी, कडी पत्ता, जिरे, हळद, लाल मिरची पुड, हिंग, धणे  जिरे पूड व मीठ चवीपुरता







कृती

१. माईक्रोवेव बाउल मध्ये १/२ चमचे तेल घेऊन, फोडणी चे सगळे समान त्यात निट मिक्स करून माईक्रोवेव मध्ये २-३ मीनिट ठेवावे. फोडणी चा सुगंध आणि मोहरी तडतडायला लागली कि बाहेर काढून घ्या.
२. मग ह्यात भाज्या टाकून निट मिक्स करून घेऊन  पुन्हा ४-५ मिनिट माईक्रोवेव करून घ्या.
३. आता ह्यात तांदूळ डाळ घालून चांगले मिक्स करून पाणी घालून पुन्हा १/२ तास माईक्रोवेव करून घ्या.
४. तयार खिचडी वर कोथिम्बिर टाकून सजवा. 

Tuesday, October 6, 2015

दुबईतील मिराकल गार्डन मध्ये केलेली फोटोग्राफी










































































गुलाब जामून का म्हणतात ?

गुलाब जमून म्हणजे इंग्रजीमध्ये रोस बेरी म्हणजे गुलाबाच्या चवीत आणि सुगंधात घोळलेले जामून म्हणजे जांभूळ. यात असलेले जामून हे जांभळासारखे दिसतात, व पाकात गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकतात, त्याने गुलाबाचा सुवास यात येतो. हा पदार्थ अरबी देशांमध्ये सुद्धा खाल्ला जातो, तेथे त्याचे नाव आहे लुक्मत अल कादी, हा पदार्थ पेर्शिअन संस्कृतीतीन भारतात आला आहे असे इतिहास सांगतो.

साहित्य -

जामूनसाठी
२ वाट्या खवा 
१/२ वाटी  मैदा 
साजूक तूप ३-४ चमचे 
दुध १ कप 

पाकासाठी- 

१/२ लिटर पाणी
५-६ केशर पाकळी 
३-४ वाट्या साखर 
३-४ वेलची पूड केलेले 

कृती 
१. जामून बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा खवा आणि तूप घेऊन त्यात थोडे थोडे दुध टाकून मळून घ्यावे व त्याचे एक इंच रुंदीचे गोळे करून घ्यावे व ते बाजूला ठेवावे. 
२. एका भांड्यात पाकचे साहित्य एकत्र करून पाक उकळायला ठेवावे  पाक उकळला आणि एक तारी झाला कि तो बाजूला काढून ठेवावा. 
३. काढइत तेल/तूप  गरम करायला ठेवावे व तयार जामून त्यात तळून घ्यावे व थोडे गरम असतानाच पाकात टाकावे. 

Monday, October 5, 2015

आजच्या स्वयंपाकघरात दुर्मिळ झालेल्या पूर्वीच्या अत्यावश्यक वस्तू / यंत्र


१. जाते- जाते हे पीठ दळण्या साठी वापरले जाते. पूर्वी त्याचा वापर करताना नकळत स्त्रियांचा व्यायाम व्हायचा. त्यातून दळलेले पीठ हे अतिशय पौष्टिक आणि ताजे असते. आजही किती गावात शेतीसाठी किवा घरगुती कामांसाठी जाते वापरले जाते. पूर्वी  स्त्रिया जाते वापरताना गाणी म्हणायच्या, ज्या मुळे असे शारीरक श्रम करताना त्यांना विरंगुळा मिळायचा.  आज जात्याची जागा मोठ्या चक्क्यांनी आणि घरगुती चक्की ने घेतली आहे.


२. पाटा वरवंटा- चटणी, वाटण किव्वा पुरण वाटायला पाटा  वरवंटा वापरला तर एक वेगळीच चव लागते, या  . अत्यंत नैसर्गिक पद्धतीने वाटताना सुद्धा स्त्रियांचा व्यायाम होतो. आता याची जागा मिक्सरने घेतली आहे. 




३. खल बत्ता - याला खल गोटा सुद्धा म्हणतात , हा मसाले वाटायला वापरला जातो. आज काल हा अनेक रुपात व आकारात  मिळतो अगदी प्लास्टिक मध्ये सुद्धा. 















४. व्हीळी- याने  पूर्वी खाली बसल्या बसल्या स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना खालीच बसून भाजी किव्वा अन्य कुठलाही पदार्थ चिरायला सोपे जायचे. तसेच नारळ खावायला सुद्धा व्हीळीच सोपी असते.



५. चूल - दगडाची, विटांची  किव्वा शेणाची चूल अजूनही किती गावात वापरली जाते

. चुलीला लागणारे सरपण गोळा करण्याचा आनंद पेट्रोल किव्वा एलपीजी विकत घेताना मिळत नाही.